निकृष्ट रस्त्याच्या बाबतीत अखेर कांगा कॉलनीतील नागरिक लवकरच श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेणार असल्याची माहिती येथील नागरिकांनी सातारनामा शी बोलताना दिली
दलित वस्ती योजनेअंतर्गत सुमारे 75 लक्ष रुपये खर्च करून हा रस्ता निकृष्ट झाला आहे परंतु प्रभागातील नगरसेविका सौ स्नेहा नलवडे व नगरसेवक तथा बांधकाम सभापती मिलिंद काकडे या प्रकरणी गप्पच असल्याने येथील नागरिकांनी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेण्याचा निर्णय एक मुखी घेतला आहे सातारानामाने वेळोवेळी बांधकाम सभापती मिलिंद काकडे व प्रभागातील नगरसेविका स्नेहा नलवडे यांना या प्रश्न रस्त्याबाबत प्रश्न विचारले असता उडवाउडवीची उत्तरे दिली हो बघतो करतो अशी उत्तरे का दिली हे मात्र समजले नाही घाईगडबडीने पालिकेतील विवेकीबुद्धीने गुरुवारी संबंधित ठेकेदारास सात लाख रुपयांचा धनादेश आरटीजीएस केला यात कोणी कोणी लक्ष्मी दर्शन घेतले हे निम्म्या साताऱ्याला माहिती झाले आहे म्हणूनच बांधकाम सभापती मिलिंद काकडे व नगरसेविका स्नेहा नलवडे गप्प असाव्यात असे दिसते
खुद्द बांधकाम सभापतींच्या प्रभागातील रस्ता निकृष्ट होत असल्याने बांधकाम सभापती शहरात उत्कृष्ट कामे कशी करणार हा एक मोठा शहराला पडेल आता प्रश्नच म्हणावे लागेल
एक मात्र नक्की प्रभागातील नागरिक फक्त मतदाना पुरतेच आपल्या जवळ असावेत असेच एक उदाहरण म्हणजे कांगा कॉलनीतील नागरिकांचा मांडलेला खेळ देव करो आणि संबंधितांना बुद्धी देऊन हा रस्ता कसा चांगला करता येईल हीच इच्छा इंजिनीयर साबळे यांचाही इतिहास काही कमी नाही ते सुद्धा या रस्त्याकडे फिरकले नाहीत हे दुर्दैवच।