कांगा कॉलनीतील निकृष्ट रस्त्याचे प्रकरण चांगलेच गाजत असताना काल पालिकेतील विवेकी बुद्धीने संबंधित ठेकेदारास सात लाखांचा धनादेश दिल्याने आपण नक्की कोणाचे काम करतोय हेच समजेना असे झाले आहे
दलित वस्ती योजनेअंतर्गत जरंडेश्वर नाका ते कॅनल अखेरपर्यंत रस्त्याचे निकृष्ट काम झाले असून जवळपास या रस्त्यावर 75 लक्ष रुपये खर्च होणार आहे ़ सातारकरांच्या पैशाची उधळपट्टी कशी करायचे याचे प्रत्यक्षिक पुन्हा एकदा पालिकेतील विवेकीबुद्धीने करून दाखवले , कांगा कॉलनीतील नागरिकांचे मणके रस्त्याने ढिले झाले असून संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये असे तक्रारी अर्ज असतानाही पालिकेतील विवेकी बुद्धीने संबंधित ठेकेदारास सात लाखाचा धनादेश आरटीजीएस ने केला गेल्याने नक्की काय समजावे हे कांगा कॉलनीसह सातारकर यांना पडलेले एक कोडेच आहे
उदया याच रस्त्याच्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारदाराची तारीख असून इंजिनीयर काय दिवे लावत आहेत हे कळलेच, मात्र संबंधित नगरसेविका स्नेहा नलवडे यावर अजून गप्प का हेच कळले नाही मोठ्या हुशारीने पालिकेतील विवेकी बुद्धीने संबंधित ठेकेदारास ॲडव्हान्स बिल आदा केल्याने भल्याभल्यांचे डोळे पांढरे झाले आहेत बांधकाम सभापती मिलिंद काकडे ही याप्रकरणी आळीमिळी गुपचिळी असेच दिसतात सर्वांनी लक्ष्मीचे दर्शन घेतल्याने आळीमिळी गुपचिळी ची भूमिका घेतली असल्याचे समजते