सातारानामाने कांगा कॉलनी येथील निकृष्ट होत असलेल्या रस्त्याच्या संदर्भात आवाज उठवला असून याला आता प्रभागाच्या नगरसेविका स्नेहा नलवडे यांनी साथ दिली असून जोपर्यंत सर्व रस्ता उत्कृष्ट होत नाही तोपर्यंत त्याचे बिल आदा करू नये असे पत्र मुख्याधिकारी यांना दिले आहे
दलित वस्ती योजनेअंतर्गत सुमारे 75 लक्ष रुपये खर्च करून सदरचा रस्ता होत आहे पालिकेतील विवेकी बुद्धीने याला सात लक्ष रुपयांचे आरटीजीएस केले गेल्याने यात नक्कीच लक्ष्मी दर्शन झाले असल्याची चर्चा आता शहर भर होऊ लागली आहे छत्रवीर सेना नंतर आता खुद्द प्रभागाच्या नगरसेविका स्नेहा नलवडे यांनीसुद्धा सातारानामाच्या वृत्ताची दखल घेत संपूर्ण रस्ता जोपर्यंत उत्कृष्ट होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये असे पत्र मुख्याधिकारी यांना दिले आहे त्याची प्रत माहितीसाठी सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व नगराध्यक्ष माधवी कदम यांना दिली आहे
सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या प्रकरणी आंदोलने केली व का गुंडाळली हा खरा प्रश्न अजून सर्वांसमोर आहेच परंतु आता प्रभागाच्या नगरसेविका सौ स्नेहा नलवडे यांनी या रस्त्याच्या संदर्भात पत्र दिल्याने येथील नागरिक यांनी त्यांचे आभारच मानले आहेत हा रस्ता नगरसेविका स्नेहा नलवडे यांनी चांगला करून घ्यावा अशी अपेक्षाही येथील नागरिकांनी सातारानामा शी बोलताना व्यक्त केली आहे