सातारा नगरपरिषदेचे उपमुख्यधिकारी संचित धुमाळ यांना लाच घेताना अँटिकरप्शन ब्युरोने रंगेहात पकडले आहे नगरपरिषद संचालनालयाकडून थेट नियुक्ती झालेल्या संचित धुमाळ यानबाबत कायदा आपले काम करेलच किंबहुना कायद्याच्या आधारे त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे पण एक आंबा नासका निघाला म्हणून आपण सर्व आंबे ते फेकून देत नाही म्हणूनच क्रूरकर्मा चा न्याय-अन्याय अधिकारी-कर्मचाऱ्यांना लावून सर्वजण एका माळेचे म्हणे असे समजून चालणार आहे अशा प्रकारच्या समजुतीने नगर परिषदेच्या प्रशासनाचे खच्चीकरण होऊन त्याचा विपरीत परिणाम नागरी सुविधांवर होणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
सातारा विकास आघाडी च्या सत्तेच्या काळात आमचे नेते खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या आठ ते दहा वर्षात ग्रेड सेपरेटर कास धरणाची उंची वाढवणे भुयारी गटार योजना घरकुल योजना घनकचरा व्यवस्थापन असे कोट्यवधी रुपयांचे मोठे प्रकल्प नागरिकांचे हित लक्षात घेऊन मार्गी लावण्यात आले आहेत शहरातील गल्लीबोळात विद्युतीकरण कॉंक्रिटीकरण गटर रस्ते आधी दैनंदिन विकास कामे तर गरजेनुसार प्राधान्याने हाताळण्यात आलेले आहेत
जे स्वतःला श्रेष्ठ असे संबोधित करतात ते नगरसेवक अशोक मोने यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात लोकहिताची वर नमूद विकास कामे यापूर्वी का केली नाहीत हा खरा सवाल उठतो सातारा विकास आघाडी किंवा नेत्यांची प्रशासनावर पकड नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागली नसती या दुर्दैवी घटनेचा फायदा घेऊन सत्तारूढ आघाडीवर टीका करणे सोपे आहे त्यांच्या दीर्घ सत्तेच्या काळात लोकहिताची वर नमूद कामे त्यांना करता आली नाहीत म्हणजेच त्यांची प्रशासनावर पकड कधी ही नव्हती असे त्यांना म्हणायचे आहे का असा प्रतिप्रश्न देखील नगराध्यक्ष सौ माधवी कदम यांनी उपस्थित केला आहे
माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील प्रामुख्याने लेखा, बांधकाम ,आरोग्य विभागासह प्रत्येक विभागात जाऊन अधिकाराने हस्तक्षेप करून अधिकारी कर्मचार्यांच्या वेळेचा अपव्यय करीत असतात तसे करण्याऐवजी त्यांना काही माहिती पाहिजे ती मुख्यअधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी मागावे त्यांनाच नाही तर अन्य कोणालाही अशा प्रकारे माहिती मुख्यअधिकारी स्तरावरून आवश्यक उपलब्ध करून दिली जाईल तसेच नरेंद्र पाटील यांनी यासंदर्भात मुलाखत देताना तृतीयपंथीयांचा एक प्रकारे अपमान व उपमर्द केला आहे आज तृतीयपंथी ही विविध क्षेत्रात कर्तबगार कामगिरी बजावत आहे तृतीयपंथीयांनी प्रत्यक्षा प्रयत्नपूर्वक दाखवलेल्या कर्तबगारीला आणि त्यांनी निर्माण केलेल्या आत्मविश्वासाला हीन लेखून नरेंद्र पाटील यांनी मात्र तडा दिला आहे असा घणाघात देखील नगराध्यक्ष माधवी कदम यांनी चढवला आहे