माझ्या कार्यकाळात अँटी करप्शन च्या रेड तर पडल्या नाहीत मोने यांचा नगराध्यक्षांना टोला

46
Adv

गेल्या तीन वर्षात सातारा पालिकेत कचर्‍यावरून किती खाबुगिरी झाली आणि कोणकोणते उद्योग झाले हे जगजाहीर आहे पालिकेत भ्रष्टाचाराने कळस गाठला असून लाचखोरीच्या प्रकारामुळे ऐतिहासिक पालिकेची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे असे असताना पालिकेच्या नगराध्यक्ष बाजार समिती कडे बोट दाखवून पालिकेतील भ्रष्ट कारभार लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत दुसरी कडे बोट दाखवून पालिकेत घडलेला लाचखोरीचे प्रकार लापणार आहे का असा खडा सवाल करतानाच नगराध्यक्षांचे बोलले म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा अजब प्रकार असल्याचा टोला विरोधी पक्ष नेते अशोक मोने यांनी लगावला आहे

सातारकरांच्या मानगुटीवर साशा नावाचे भूत बसवून कचर्‍यातून पैसा गोळा करणाऱ्यांचा फंडा सत्ताधाऱ्यांनी सुरू केला गोरगरीब घंटागाडीच्या लोकांच्या पोटावर मारण्याचे प्रकार झाले तर सातारा विकास आघाडीच्या विशाल जाधव या नगरसेवका मुळे एका घंटागाडी चालकावर आत्महत्या करण्याची दुर्दैवी वेळ आली हे सारे प्रकार कशासाठी आणि कोणासाठी घडली हे सातारकरांना ही कळले आहे सातारे पालिका मध्ये भ्रष्टाचाराचे कुरण झाले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून धडक कारवाई केली आणि सुरू असलेला भ्रष्टाचार उघडकीस आणला प्रशासनावर वचक नाही अधिकारी कर्मचार्‍यांच्या मनमानी कारभारावर अंकुश ठेवता येत नाही अशा नगराध्यक्ष केवळ नामधारी च आहेत हे वारंवार सिद्ध झाले आहे बाजार समितीमध्ये प्रकार घडला त्यावेळी कोणीही सत्तेवर नव्हते आणि चेअरमन ही कोणी नव्हता त्यावेळी बाजार समितीवर प्रशासक होते आणि जो प्रकार घडला त्यात न्यायालयाने निकाल दिला असून संबंधित सचिवाला निर्दोष मुक्त ही केले आहे याची माहिती नगराध्यक्ष यांनी घ्यायला हवी होती

सातारा पालिकेत घडलेला निंदनीय आणि संतापजनक प्रकार लपला जाणार आहे का अब्रू वेशीला टांगली यानंतर पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काय फायदा साशा कंपनीचा ठेक्यावरुन पालिकेत झालेला घोडेबाजार आणि त्यासाठी एकमेकीची एकमेकांची गचुंडी धरण्याचे प्रकार रोखण्यासाठी दस्तुरखुद्द नेत्यांना लक्ष द्यावे लागते तरीही पालिकेत खाबुगिरी चे प्रकार थांबले नाहीत आता तर पालिका कार्यालययात रेड पडली आणि अधिकारी रंगेहात सापडली आता अधिक नीट वागा अशा सूचना देण्यात आणि स्वतःचे काळे झालेले तोंड लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ असा प्रतिसवाल ही मोने यांनी केला आहे

मी नगराध्यक्ष असताना अनेक मोठी कामे शहरात झाली आता मी पालिकेत विरोधी पक्ष म्हणून काम करतो सातारकरांचा सेवक म्हणून काम करताना आम्ही नेहमीच सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या कामाला विरोध केला आणि सातारकर यांच्या हिताच्या चांगल्या कामाला पाठिंबा देण्याचे काम केले आहे अनेक कामे माझ्याकडे काळात झाली हे खरे आहे आणि नगराध्यक्ष यांच्या या बोलण्यात सत्य आहे पण अँटी करप्शन ची रेड एवढं मोठं काम माझ्याकडून झालं नाही आणि भविष्यात ही होणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला

Adv