: सातारा लोकसभा पोटनिवडणूक 2019 व सातारा जिल्हा सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2019 ची मतमोजणी गुरुवार दि. 24.10.19 रोजी नवीन एमआयडीसी डीएमओ गोडाऊन सातारा येथे होणार आहे. या निवडणूकच्या कामकाजाकरिता नेमलेले शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवरांचे मतमोजणी प्रतिनिधी व इतर यांना भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल बाळगण्यास सक्त मनाई केली आहे.