Friday, June 5, 2026
spot_img
Home Satara District नितीन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

नितीन पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

1440
Adv

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान नितीन काकांना मी खासदार करतो असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाई येथील सभेत दिला होता तो त्यांनी पाळल्याने शब्दाचा पक्का वादा अजित दादा ही मन पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिली आहे

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा राहील असे भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतली होती महायुतीत सातार लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वाटायला आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बदल्यात राज्यसभेची जागा भारतीय जनता पार्टीकडे मागितली होती हि जागा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळाली असून या जागेवर आता नितीन काका पाटील यांची वर्णी लागली आहे त्यामुळे वाईसह राष्ट्रवादीच्या गोटात आनंद द्विगणित झाला आहे

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाई येथील सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर वक्तव्य केले होते की महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करा मी नितीन काकाला खासदार करतो नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य केले होते हे वक्तव्य तंतोतंत पाळले असून शब्दाचा पक्का वादा अजितदादा याची प्रचिती पुन्हा सातारा जिल्ह्याने अनुभवली

Adv