मार्केट कमिटी मध्ये सचिव पदावरील श्री मनवे नामक व्यक्तीला लाचखोरीच्या आरोपात अटक करण्यात आली होती त्यावेळी तत्कालीन मार्केट कमिटीच्या सभापती असलेल्या व्यक्तीचा जर नगरसेवक मोने यांनी सातारच खऱ्या अर्थाने हीत पाहणारे नागरिक म्हणून त्यावेळी राजीनामा मागितला असता तर त्यांना आज माझा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार होता तथापि आपलं ते पोरगं दुसऱ्याचं ते कार्ट अशी दुटप्पी भूमिका असलेल्या अशोक मोने यांनी स्वतःच्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा आणि मग माझे राजीनाम्याबाबत वाच्ता करावी अशा सडेतोड शब्दात साताऱ्याच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांनी ज्येष्ठ नगरसेवक अशोक मोने यांना फटकारले आहे
वास्तविक एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून मोने यांना ओळखते नगर परिषदेच्या कामकाजात आम्ही सर्व नगरसेवक नेहमीच अशोक मोने आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांची विचार-विनिमय करीत असतो अशा अशोक मोने यांनी मला गांधारी ची उपमा दिली महाभारतातील गांधारी तिचा राजा असलेला पती अंध होता म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली होती आज माझे पती ना राजा आहेत ना अंध त्यामुळे ही उपमा मला लागू होत नाही त्यांना कदाचित दुसऱ्या बाबतीत बोलायचे असेल पण ते बोलता येत नसेल म्हणून त्यांनी उचलली जीभ लावली टाळ्याला असा खटाटोप केल्याचे दिसत आहे
गांधारी ची उपमा मला नाही तर तुम्हालाच लागते सातारकरांच्या हिताचा तुम्हास कधीही न जमलेला विकास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा विकास आघाडीने केला आहे तो तुम्ही डोळ्यावर पट्टी बांधल्याने दिसत नाही त्यामुळे गांधारी कोण आहे हे जनतेला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही शासनाकडून वेगवेगळ्या योजनेसंदर्भात आलेल्या निधी ज्या त्या योजनेवर रीतसर पणे सातारकराचे लोक हित लक्षात घेऊन विनियोगात घेण्यात येत असतो हे मोने यांना माहिती नाही याचे फार मोठे आश्चर्य वाटते त्यामुळे अशोक मोने यांनी डोळसपणे काही गोष्टी पाहावयात असे माझे सांगणे आहे
सातारकरांन मध्ये क्लिप व्हायरल झाले आहेत असे मोने सांगत आहेत मोने यांनी माझ्या बाबतीत किंवा आमच्या आघाडीच्या बाबतीतील तथाकथित असलेले क्लिप सिद्ध करून दाखवावी आणि मगच याबाबत आपले मत प्रदर्शन व्यक्त करावे कोणाची क्लिप कोण कोणाची नावे घेतो याचा प्रत्यक्ष संबंध मोने यांनी जोडून सिद्ध करून दाखवावा उगाच हवेत गोळ्या मारून स्वतः हिरो असल्यासारखं बालिशपणा त्यांनी दाखवू नये सध्या ही बाब न्यायप्रविष्ट होत आहे त्याबाबत आज वक्तव्य करणे योग्य होणार नाही आमचा न्याययंत्रणा आणि पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे उभ्या महाराष्ट्राचे नेते श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भ्रष्टाचाराला कधीही खतपाणी घातले नाही किंबहुना ते नेहमीच भ्रष्टाचार विरुद्ध आवाज उठवत आलेले आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळे येणाऱ्या काळात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही सातारकरांच्या विश्वासाला कदापिही तडाजाऊ देणार नाही असेही ही नगराध्यक्ष माधवी कदम यांनी आपल्या प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे