जिल्हा परिषद सदस्य ते महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री

415
Adv

जिल्हा परिषद सदस्य ते त्याच विभागाचे ग्रामविकास मंत्री अशी ओळख आता सातारा जिल्ह्यातील आमदार जयकुमार गोरे यांची झाली आहे काल खाते वाटपामध्ये आमदार जयकुमार गोरे यांची ग्रामविकास मंत्री म्हणून वर्णी लागली

आमदार जयकुमार गोरे यांनी 2007 साली आंधळी जिल्हा परिषद गटातून निवडून लढवून पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवून आपली राजकीय सुरुवात केली त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये काय अडीअडचणी असतात याची जाण ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना चांगलीच आहे ग्रामीण भागातून येऊन महाराष्ट्राच्या पटलावर राजकीय ठसा उमटवण्यात आमदार जयकुमार गोरे हे यशस्वी ठरले

ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे हे उद्या सातारा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत जिल्ह्याच्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेतच मात्र जिल्हा परिषदेचे सदस्य ते त्याच विभागाचा ग्रामविकास मंत्री म्हणून गोरे यांनी जिल्ह्यात आपला वेगळा इतिहास रचला आहे

Adv