Saturday, October 24, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City सातारा जिल्हयाची दळणवळण सुविधा आधुनिक करणार :-

सातारा जिल्हयाची दळणवळण सुविधा आधुनिक करणार :-

313
Adv

सार्वजनिक बांधकाम विभागाचा कॅबिनेट मंत्री या नात्याने मंत्रीपद सांभाळताना सातारा जिल्ह्यातील दळणवळण प्रक्रिया सुलभ करणे आणि त्यासाठी जिल्हा अंतर्गत रस्त्यांचे जाळे मजबूत करणे ही आमची प्राथमिकता असणार आहे यापूर्वी तत्कालीन बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एशियन बँकेच्या माध्यमातून मोठा निधी उभा केला होता त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या दळणवळण प्रक्रियेत सुलभता आणणार असल्याची पहिली प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे

नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार जाहीर झाल्यानंतर आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर शिरवळ येथे मोठ्या जल्लोषात कार्यकर्त्यांनी स्वागत केले. बाळासाहेब खंदारे मित्र समूहाच्या वतीने व भाजप कार्यकारिणीचे वरिष्ठ पदाधिकारी अनुप सूर्यवंशी मित्र समूहाच्या वतीने 21 फुटी हार क्रेनच्या माध्यमातून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना घालण्यात आला तिथून ते थेट साताऱ्यापर्यंत ठीक ठिकाणी शिवेंद्रसिंह राजे यांचे स्वागत सत्र नंतर सुरूच राहिले

तत्पूर्वी शिरवळ येथे पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ” कॅबिनेट मंत्री पद हे अत्यंत महत्त्वाचे असून सातारा जिल्ह्यातील आम्हा चारही मंत्र्यांची जबाबदारी वाढलेली आहे सातारा जिल्ह्याने महायुतीला भरभरून साथ दिली त्यादृष्टीने भारतीय जनता पार्टीने त्यातून उतराई होणे तसेच पक्षाची मजबूत वाटचाल ठेवणे याकरिता जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री पदे दिली आहेत तर शंभूराज देसाई यांना पर्यटन आमदार जयकुमार गोरे यांना ग्रामीण विकास यंत्रणा आमदार मकरंद पाटील यांना मदत व पुनर्वसन ही खाती दिली आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रश्न सुटायला आता काहीच हरकत नाही .पाटणमध्ये अतिवृष्टी तर माण तालुक्यांमध्ये दुष्काळ खंडाळा तालुक्यामध्ये पाणीटंचाई साताऱ्यामध्ये सेवा अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था या सर्व प्रश्नांना आम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून निश्चितच न्याय देणार आहोत .तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी एशियन बँकेच्या माध्यमातून मोठा निधी उभा केला होता त्याच धर्तीवर आम्ही काम करणारा असून केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांची आम्ही भेट घेतली आहे . पुणे सातारा रस्त्याचे सहा पदरीकरण या संदर्भात चर्चा करण्यात आली असून या रस्त्याच्या ठेकेदार कंपनीकडून हे काम काढून घेतले जाणार आहे रिलायन्स इन्फ्रा या ठेकेदार कंपनीच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे लवकरच या रस्त्यासाठी फेरनिविदा काढली जाणार असून महामार्गाच्या सहा पदरीकरणाची कामे चांगल्या पद्धतीने करण्यात येणार आहेत .

पालकमंत्री म्हणून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव सध्या आघाडीवर आहे या संदर्भात बोलताना शिवेंद्रसिंह राजे म्हणाले सध्या कॅबिनेट मंत्री पदाच्या संदर्भात मी माहिती घेत असून ही माझी पहिलीच टर्म आहे सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या नावाची चर्चा या संदर्भात मला काही माहीत नाही मात्र या प्रश्नावर महायुतीचे तिन्ही वरिष्ठ नेते या संदर्भात निर्णय घेतील पक्षाच्या माध्यमातून मला जो आदेश दिला जाईल त्या पद्धतीने माझी कामाची अंमलबजावणी असेल असे त्यांनी स्पष्ट केले आह

Adv