
विधानसभा निवडणुकीसाठी फॉर्म भरायला काही दिवस बाकी असताना शरद पवार गटाला माण खटाव मतदार संघातून उमेदवार द्यायचा कोण असाच प्रश्न अजून तरी पडला आहे त्यामुळे बैठकीसाठी गेलेल्या माण खटाव येथील नेत्यांचा हिरमोड झाला असल्याचे समजते?
आमदार जयकुमार गोरे यांचे विरोधात तगडा उमेदवार कोण द्यायचा यासाठी शरद पवार यांनी मान खटाव येथील सर्व नेत्यांना मुंबईत मीटिंगसाठी बोलावले होते हे सर्व नेते मीटिंगसाठी उपस्थित झाले प्रत्येक नेत्याने आपली भूमिका शरद पवार यांच्यासमोर मांडली या चर्चे नंतर दस्तूर खुद्द पवार साहेब यांनीच मुंबईत आलेल्या सर्व नेत्यांना वेट अँड वॉचची भूमिका घ्यायला लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे
अर्ज भरण्यासाठी आता कमी कालावधी राहिला तरी भाजप उमेदवार जयकुमार गोरे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार सापडत नसल्याची चर्चा माण खटाव तालुक्यात रंगत असून महाविकास आघाडीला मान खटाव मतदारसंघात
उमेदवारीचा सूर गवसणार कधी अशी आशा लागलेली आहे