डॉ. गोऱ्हे यांची ग्रामीण महिला उद्योजकांच्या माणदेशी महोत्सवास भेट

245
Adv

मुंबई दि.४ : माणदेशी फाउंडेशन जीवन बदलण्याचे काम करत आहे. माणदेशी फाउंडेशनच्या वतीने होणाऱ्या कामांना शासनाने चालना मिळाली पाहिजे असे प्रतिपादन विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले. आज डॉ. गोऱ्हे माणदेशी फाउंडेशन आयोजित माणदेशी महोत्सव, मुंबई या सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बचत गटांमधील उद्योजकांच्या प्रदर्शनास भेट दिली. हे प्रदर्शन प्रभादेवी, दादर भागात रवींद्र नाट्य मंदिर येथे ५ ते ८ जानेवारी, २०२३ या कालावधीत आयोजित केले आहे.

माणदेशी फाउंडेशनच्या वतीने महिलांच्या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या चेतना सिन्हा गाला आहेत. श्रीम. गाला ह्या हाक दिली की जनतेच्या हिताचे काम करण्यासाठी उभे राहणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांना जीवन देण्याचे काम देखील माणदेशी फाउंडेशन काम करत आहे असा विश्वास देखील डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केला.चेतना सिन्हा यांच्या टीम मध्ये प्रभात व करण त्यांचे दोघेही चिरंजीव सहभागी असल्याबद्दल नीलमताई गोर्हे यांनी विशेष नोंद घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

व्हाट्सएपवर आलेली सर्व माहिती तपासून त्यानंतरच सर्वांनी फॉरवर्ड करण्याचा सल्ला देखील डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी महिलांना दिला. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडून घेण्यासाठी व्हाट्सएपचा वापर करून घेण्यात यावा असेही त्यांनी सुचविले. शासकीय पातळीवरील महिलांचे काम करण्यासाठी किंवा वेगाने मदत होण्यासाठी महिलांनी व्हाट्सएपचा वापर करावा. आवश्यक असणारे महत्वाचे कागदपत्रे, योजनांची माहिती व्हाट्सएपद्वारे वा समाज माध्यमावर देण्याने शासकीय योजना प्रभावी होऊ शकतात असा अनुभव आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Adv