उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा आमदार गोरे यांनी केला सत्कार

169
Adv

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला दिलेला पाण्याचा शब्द पाळला आहे, त्याबद्दल त्यांची मंत्रालयात भेट घेऊन आभार मानले असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली

सरकारकडून सातारा जिल्ह्यातील कृष्णाखोरे प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास मान्यता देण्यात आली. कृष्णा खोरे प्रकल्पाचे फेरजलनियोजन करण्यात आले आहे. दि.३१/०१/२०२३ रोजी माण खटाव मतदार संघातील पाणी प्रश्नावर आग्रही भूमिका घेत सातत्याने पाठपुराव्यामुळे वरील प्रश्नासंदर्भामध्ये मतदार संघाकरिता विशेष बैठक मा. उपमुख्यमंत्री साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती.

यावेळी कृष्णा खोरे प्रकल्पाच्या फेर जलनियोजनास मान्यता द्यावी व दुष्काळी भागातील ज्या वंचित गावांना कोणत्याही योजनेतून पाणी उपलब्ध होऊ शकत नाही अशा गावांना फेर जलनियोजनातून #सिंचन प्रकल्पातून पाणी द्यावे अशी मागणी केली होती. माढा लोकसभा खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर ,आ.शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली होती.

त्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मान्यता देऊन माण खटाव विधानसभा मतदार संघातीलजिहे कठापूर योजनेतून २.५७ टीएमसी.टेंभू प्रकल्पातून माण_खटाव तालुक्यातील वंचित दुष्काळी ४८ गावांना २.५० टीएमसी

भविष्यात या मतदार संघातील कोणतीही पाणी योजना व कोणतेही गाव पाण्यावाचून वंचित राहणार नाही. अशी काळजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतली व मतदार संघातील जनतेला दिलेला पाण्याचा शब्द पाळला असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे मनापासून अभिनंदन केले.

Adv