भाजप तर्फेच माढा लोकसभा लढवणार.. धैर्यशील मोहिते पाटील

329
Adv

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजप तर्फे निवडणूक लढवणार असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फेच निवडणूक लढवणार असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सातारानामाशी बोलताना स्पष्ट सांगितले गेल्या तीन दिवसापासून विविध मान्यवरांच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी घरी जाऊन गाठीभेटी घेतल्याने विद्यमान खा रणजितसिंह निंबाळकर यांचे एक प्रकारे टेन्शनच वाढवले असल्याचे दिसून येते विजयसिंह मोहिते पाटील दादा यांना या मतदारसंघाने खासदार म्हणून निवडून दिले होते या मतदारसंघात बऱ्याच जणांचे दोन पिढ्यापासून आमच्या घरांशी संबंध असल्याने या गाठीभेटी घेतल्या असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले

धैर्यशील मोहिते पाटील यांनी घेतलेल्या गाठीभेटीने एक प्रकारे खा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक प्रकारे शह दिला असून माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास धैर्यशील मोहिते पाटील ठाम असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका येणाऱ्या काळात या मतदार संघात महत्त्वाची ठरणार असून धैर्यशील मोहिते पाटील यांनी खा रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना चेकमेट करण्याची कोणतीही संधी सोडत नसल्याचे दिसून येते

Adv