माणदेशी फाउंडेशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या माणदेशी महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांनी महोत्सवातील प्रत्येक स्टॉलला भेट देवून महिला उद्योजकांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या.
२१ ते २५ नोव्हेंबर कालावधीत चालणाऱ्या महोत्सवामध्ये माणदेशी मटण, हुर्डा पार्टी, मच्छी थाळी, अस्सल ग्रामीण फरसाण व शेवचिवडा, माणदेशी व सोलापुरी मसाले, कडक भाकऱ्या ज्वारी, कडधान्य, पिठाचे जाते, लोकरी जेन, चपला, कपडे यासह अनेक स्टॉलचा समावेश महोत्सवामध्ये करण्यात आला आहे.
दरम्यान उद्घानप्रसंगी माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, रेखा कुलकर्णी, वनिता शिंदे यांची उपस्थिती होती.