माण तालुक्यातील सर्व शाळांमधे भारतीय संविधानाच्या उद्देशिका वाचन करण्यात यावे : किरण खरात

46
Adv

26 जानेवारी 2020 पासून सर्व शाळांमधे भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे समूह वाचन करने अनिर्वाय आहे दिनांक 21 जानेवारी च्या शाशन निर्णयप्रमाने भारतीय संविधान ची पुरेशी माहिती नागरिकांना आणि येणाऱ्या नवीन पिढीला होण्यासाठी शालेय जीवनापसुन शाळेत दररोज परिपाठ वेळी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मुलतत्वे आणि आपले संविधानिक अधिकार , हक्क आणि कर्त्यव यांची जाणीव विद्यार्थ्यांना होनेकारिता शाशन निर्णयप्रमाने संविधानाची उद्देशिका (preamble) रोज शाळांमधे परिपाठ वेळी वाचन करने गरजेचे आहे.

परंतु माण तालुक्यातील बहुतांश शाळांमधे 26 जानेवारी 2020 पासून या उपक्रमची कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही त्यामुळे या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते किरण खरात यांनी मा गठविकास अधिकारी माण(दहिवड़ी) शेलार साहेब यांना दिले.

हा उपक्रम अतिशय सुतत्य असून preamble चे वाचन करनेचे तालुक्यातीले सर्व शाळांना आदेश दिले होते परंतु त्याची अंमलबजावणी होत नसेल तर गठशिक्षण अधिकारी यांचे कडून तात्काळ अहवाल मागवुन योग्य ते आदेश देण्यात येतील : जी .डी. शेलार गटविकास अधिकारी माण

Adv