सातारा लोकसभेच्या चुरशीने झालेल्या पोट निवडणुकीत 67 टक्के मतदान झाले. पाच महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 60.33 टक्के मतदान झाले होते. दोन्ही निवडणुकीत मताचा टक्का सहा टक्क्याने वाढला आहे. हा वाढलेला मताचा टक्का उदयनराजे भोसले की श्रीनिवास पाटील यांच्या पथ्यावर पडणार याचीच उत्सुकता साताऱ्यात आहे
सर्वाधिक मतदान कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात 64.57 झाले असून सर्वात कमी मतदान सातारा विधानसभा मतदारसंघात 55.13 टक्के आहे. वाईत 61.64, कोरेगाव 63.41, कऱ्हाड उत्तर 63.62, पाटण 63.86, सातारा 55.13, कऱ्हाड दक्षिण 64.57 टक्के इतकी आहे. साताऱ्याच्या या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून उदयनराजे चौकार मारणार की श्रीनिवास पाटील हॅटट्रीक करणार याची उत्सुकता सातारकरांत आहे