सातारा पालिकेत उपनगराध्यक्ष मनोज शेंडे नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली मात्र या जयंतीदिनी नगराध्यक्ष माधवी कदम ,बांधकाम सभापती मिलिंद काकडे व अन्य सभापती अनुपस्थित होते
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. जयंती महाराष्ट्रात साजरी होत असताना सातारा पालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सुद्धा ती साध्या पद्धतीने साजरी केली गेली ही साजरी करताना उपनगराध्यक्ष मनोज शेंडे नियोजन सभापती ज्ञानेश्वर फरांदे काही सामाजिक कार्यकर्ते व नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते मात्र या जयंतीदिनी सातारा शहराच्या प्रथम नागरिक सौ माधवीताई कदम बांधकाम सभापती मिलिंद काकडे महिला बालकल्याण सभापती सुनीता पवार पाणीपुरवठा सभापती यशोधन नारकर व अन्य सभापती गैरहजर असल्याची चर्चा जास्त होती
फुले दांपत्यानी समाज परिवर्तनाचे मोठे काम केले आहे यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहे. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अखेरच्या श्वासापर्यंत लोकांसाठी काम करीत राहिल्या. त्यांच्या कार्याचाही गौरव ब्रिटीश सरकारने केला. मात्र त्यांच्यात जिल्ह्यात त्यांच्या जयंतीदिनी अन्य पदाधिकारी उपस्थित नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली
याबाबत नगराध्यक्ष सौ माधवीताई कदम यांच्याशी संपर्क साधला असता जवळच्या स्नेही यांचे लग्न समारंभ असल्यामुळे आम्ही आज उपस्थित राहिलो नसल्याचे त्यांनी सातारानामाशी बोलताना सांगितले