
भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम करत विधान परीक्षेषेदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी जलसंपदा मंत्री आ. शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांचे पक्षात स्वागत करून राष्ट्रवादीच्या बीसी ओबीसी सेलच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्त करून काम करण्याची संधी दिली आहे.
रमेश उबाळे यांनी गेली तीन-चार वर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये विविध पदांवर काम करताना भारतीय जनता पार्टीमध्ये हिरीरीने काम केले आहे. परंतु मुळात आपला पिंड शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा असून हा विचार भारतीय जनता पार्टीला मान्यच नसल्याने आपण या पक्षाचा त्याग करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानसभेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ.शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रमेश उबाळे यावेळी म्हणाले.
ल्हासुरणें ता.कोरेगाव येथील असलेले हे एक हरहुन्नरी कार्यकर्ता म्हणून रमेश उबाळे यांची राजकीय, सामाजिक क्षेत्रात ओळख आहे. सातारा येथे त्यांचा बालाजी कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय असून त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड आहे. दरवर्षी आपल्या स्वतःचा तसेच कुटूंबियांचा वाढदिवस अंध, अपंग, गतिमंद विद्यार्थ्यांबरोबर साजरा करून त्यांना आर्थिक मदतही करतात. बालाजी कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून कोरेगाव, सातारा तालुक्यातील तसेच ल्हासुरणे जिल्हा परिषद गटातील अनेक गोर गरीब कुटूंबातील विद्यार्थ्यांना गणवेश, शालेय साहित्य मोफत दिले आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी घेतली आहे. तसेच अनेक सामाजिक संघटना, गणेश उत्सव मंडळांना त्यांनी सामाजिक कार्यासाठी सढळ हाताने रमेश उबाळे यांनी मदत केली आहे.
कोरेगाव-सातारा रस्त्यावर असलेल्या भिवडी, त्रिपुटी गावातील अनेक विद्यार्थ्यांना बस वेळेत न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. म्हणून त्यांनी या विद्यार्थ्यांसाठी उभारलेले रस्ता रोको आंदोलन आजही ग्रामस्थांच्या लक्षात आहे. तर मंगळापूर, तांदुळवाडी गावात बस यावी म्हणून संबधीत अधिकाऱ्यांना निवेदने देऊन पाठपुरावा केला होता म्हणून ग्रामस्थ सांगतात कोरोना काळात भिवडी ता.कोरेगाव रेशन कार्ड धारकांना रेशन मिळत नाही म्हणून त्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदारांकडे पाठपुरावा करून धान्य मिळवून दिले होते. लोकांच्या कामासाठी प्रसंगी प्रशासनाला अंगावर घेणारा कार्यकर्ता म्हणून रमेश उबाळे यांची ओळख असून या कामांमधून जनमाणसामध्ये त्यांची उत्तम अशी प्रतिमा तयार झाल्याचे बोलले जाते.
सुमारे तीन वर्षांपूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपले काम सुरू करत समाजातील विविध घटकांना न्याय मिळवुन देत त्यांनी भारतीय जनता पार्टी हा पक्ष तळागाळातील लोकांपर्यँत पोहचवीन्यामध्ये त्यांचे योगदान राहिले आहे परंतु आपला मूळचा पिंड शाहू, फुले, आंबेडकर विचारांचा असून आपले विचार भारतीय जनता पार्टी या पक्षाला मान्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपली घुसमट सुरू झाल्याचे ते सांगतात दरम्यान त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितल्यानंतर आ. शिंदे यांनी रमेश उबाळे यांचे म्हणणे, विचार ऐकून घेतलेनंतर आ. शिंदे यांनी त्यांना राष्ट्रवादीच्या बीसी ओबीसी सेलमध्ये काम करण्याचे सांगितले. रमेश उबाळे यांनीही आ. शिंदे यांचे म्हणणे मान्य करत भाजपला रामराम करून रामराजे नाईक निंबाळकर, आ. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड. जयदेव गायकवाड यांनी नियुक्तीपत्र दिले. हे पत्र रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या हस्ते रमेश उबाळे यांना सुपूर्त करण्यात आले. यावेळी आ. शिंदे, ऍड.जयदेव गायकवाड, जिल्ह्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील माने, सुनील पाटील,डॉ.नितीन सावंत, उपस्थित होते.
चौकट
माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते शरदचंद्रजी पवार यांचा शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे वारसदार आहेत. त्यांचा दि.१२.१२.२०२० रोजी वाढदिवस असून त्यांच्या वाढदिवसाची वेळ साधून आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचे रमेश उबाळे यांनी यावेळी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
रामराजे, आ.शिंदे यांनीही दिल्या शुभेच्छा!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व समाज घटकांना बरोबर घेवून जाणारा पक्ष असून तुम्हाला काम करण्याची या ठिकाणी चांगली संधी आहे. असे म्हणत रमेश उबाळे यांना रामराजे नाईक- निंबाळकर व आ.शशिकांत शिंदे यांना शुभेच्छा दिल्या.