कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची कृष्णा खोरेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला गेला असून आमदार शशिकांत शिंदे यांनी मंत्री पदाची शपथ घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करून कॅबिनेट मंत्री पदाचा दिला आहे मात्र सोशल मीडियावर आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून आ शशिकांत शिंदे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून रियल मध्ये मंत्री असण्यात आणि मंत्री पदाचा दर्जा असण्यात यात बराच फरक असल्याचे हे ब्रीद वाक्य अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे
येणाऱ्या काळात कोरेगाव मतदार संघात पाण्यावरून राजकारण चांगलेच तापणार हे मात्र नक्की असून आमदार महेश शिंदे व आमदार शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांकडून आत्तापासूनच सोशल मीडियावर उत्तराला प्रत्युत्तर चालू असल्याचे पाहायला मिळते