कोयना धरणावर 7 फूट लांब अडकलेल्या अजगरास सर्पमित्रांनी जीवदान दिले

52
Adv

जगप्रसिद्ध असलेल्या कोयना धरणाची मोहनी प्रत्येकाला आहे. राष्ट्राची राष्ट्र वर्धिनी ते महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोयना धरणाला संबोधले जाते. तांत्रिक अभियांत्रिकीचा अविष्कार असणारे कोयना धरण पहाण्यासाठी देशभरातून लोक येत असतात.गत दोन महिन्यापूर्वी कोयना धरणावर बिबट्याने एंट्री करून जरब निर्माण केली आसतानाच रविवारी चक्क एका महाकाय अजगराने धडक देवून कोयना धरणावर दर्शन दिले आहे.या अजगराने कोयना धरणावर एंट्री केल्यामुळे कर्मचारी वर्गात प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन्यजीव विभागाच्या जाबाज सर्पमित्रांनी हा अजगर पकडण्यासाठी जिवाची पर्वा न हा अजगर पकडल्यामुळे सर्वाचा जीव भांड्यात पडला आहे.
रविवारी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 5 वाजल्याच्या सुमारास कोयना धरण माथ्यावर धरणाच्या भिंतीच्या मधोमध 7 फुटी अजगर अडकला असल्याचे कोयना धरणावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या लक्षात आले. यामुळे एकच घबराट पसरली.धरणाच्या भिंतीमध्ये मधोमध अडकलेल्या या अजगरास बाहेर काढणे हे अत्यंत जोखमीचे काम होते.यावेळी वन्यजीव विभागाचे सर्पमित्र विकास माने व अश्वजीत कदम यांनी जोखीम पत्करुन या अजगरास बाहेर काढून जीवदान दिले आहे.जवळजवळ एक तास यासाठी प्रयत्न सुरु होते.सर्पमित्रांनी हा अजगर जिवंत पकडून त्याला जीवदान दिल्यानंतर थरकाप उडालेल्या कोयना प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यानी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
कोयना अभयारण्यात कोयना धरण परीसराचा समावेश होतो. पाटण तालुक्यात आजपर्यंत जे अजगर सापडले आहेत ते कोयना अभयारण्याच्या कोअर झोन मध्ये सोडण्यात येतात यामुळे या वन्यपप्राण्यांचा वावर सगळीकडे होताना दिसत आहे.

Adv