कराड नगरपरिषदेने घरगुती गणेश विसर्जनासाठी सुमारे शंभर जणांची टीम तयार केली असून प्रत्येक प्रभागांमध्ये पालिकेचे कर्मचारी फिरून नागरिकांवरील विसर्जना वरचा भार कमी करणार आहे हे फक्त कराड पालिकेनेच केले असून साताराची पालिका मात्र कृत्रिम तळ्यावरच जोर देताना दिसते कारण यात आपले हितसंबंध टेंडर प्रक्रिया राबवता येते त्यातून एखादा कार्यकर्ता जगवता येतो म्हणूनच की काय हा कृत्रिम तळ्याचा खटाटोप हे गणपती बाप्पाला च माहिती असेच म्हणावे लागेल
काही दिवसांपूर्वी अलंकार हॉल येथे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उपस्थितीत गणेश मंडळ प्रशासन व सातारा पालिकेचे मान्यवर पदाधिकारी मुख्याधिकारी हे उपस्थित होते तेव्हाही जिल्हाधिकारी यांनी आवाहन केले होते की मुर्ती संकलनावर जास्त भर द्या यालाही सातारा पालिका प्रशासनाने कुठे प्रतिसाद न दिल्याचे दिसून येते
कराड पालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये पालिकेचे वाहन फिरणार आहे. त्यासाठी 28 वाहनांचे नियोजन करण्यात आले असून पालिकेचे शंभर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कराड पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. कराड शहरात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे.प्रत्येक गल्ली बोळात करोनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यातच गणेशोत्सव सुरू झाला आहे. उत्सवप्रियतेमुळे अनेकजण एकत्रित येण्याची शक्यता जास्त असते. त्यातून करोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. यासाठी प्रशासनाने गणेश मंडळांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला मंडळांनीही प्रतिसाद दिला आहे।
कोरोनाचा विळखा सातारा शहरात ही हळूहळू जोर धरू लागला आहे यातच गणेश मूर्ती संकलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असता तर तो योग्य ठरला असता मात्र गणेश विसर्जन करताना होणाऱ्या गर्दीवर तरी सातारा पालिका प्रशासनाने नियंत्रण ठेवावे अशी बुद्धी गणपती बाप्पा देईल अशीच प्रार्थना करावी की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे