आजी-माजी बांधकाम सभापतींच्या दुर्लक्षाने कांगा कॉलनीतील नागरिक त्रस्त

75
Adv

गेल्या महिनाभरापासून जरंडेश्वर नाका ते कॅनल पर्यंतचा रस्ता तसाच पडला असून कांगा कॉलनी सह तेथील नागरिकांना याचा त्रास सहन करत मणके ढिले करण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसून येते लवकरच आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे

मोठ्या हौसेने नगरसेविका स्नेहा नलवडे व बांधकाम सभापती काकडे यांना येथील नागरिकांनी तीन वर्षापूर्वी निवडून दिले त्याची परत फेड म्हणून त्यांनी आम्हाला मणके ढिले करण्याचं पोचपावती दिली की काय तो असा रस्ता केलाय खुद्द बांधकाम सभापती या प्रभागात राहतात तरीसुद्धा अशी या रस्त्याची अवस्था का बऱ्याच नागरिकांचे या रस्त्यात संदर्भात लक्ष्मी दर्शन झाले काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर बिल काढू नये म्हणून अर्ज ही दिले आहेत परंतु संबंधित इंजिनियर या सर्व गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत नक्की कोणी कोणी यात लक्ष्मी दर्शन घेतले हे सर्व पालिकेसह कांगा कॉलनीतील नागरिकांनाही माहिती आहे म्हणूनच आमच्या नगरसेविका व नगरसेवक गेल्या महिन्याभरापासून गप्प आहेत

नगरसेविका स्नेहा नलवडे या रस्त्यावरून मोठ्या गाडीतून ये जा करतात म्हणून त्यांना रस्ता खराब असल्याचे जाणवत नसावे दोन चाकी वाहनांवरून , त्यांनी येऊन जाऊन दाखवावे मग काय अवस्था आहे हे त्यांना कळेल येणाऱ्या निवडणुकीला त्यांना काय उत्तर द्यायचे हे ठरवले असून रस्ता नाही झाला तरी चालेल अशी भूमिका कांगा कॉलनीतील नागरिकांनी घेतली आहे

Adv