गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले ओदश जारी

59
Adv

कोरोना विषाणुचा संसर्ग होऊ नये यासाठी सातारा जिल्ह्यातील सभागृहे, मंगल कार्यालये बंद करण्याचे तसेच धार्मिक कार्यक्रम (लग्न कार्य, विधी, रिसेप्शन इत्यादी) कार्यक्रम घरगुती पद्धतीने घरच्या घरी करावेत. परंतु या कार्यक्रमांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमीनल प्रोसिजर कोड 1973  चे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश जारी केले आहेत.
                       या आदेशानुसार प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील खासगी अथवा सार्वजनिक सर्व प्रकारची सभागृहे, मंगल कार्यालये, सभामंडपे चालू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणतेही धार्मिक कार्यक्रम (लग्न कार्य, विधी, रिसेप्शन)  इत्यादी कार्यक्रम घररातच करावेत. या कार्यक्रमांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास या आदेशानुसार मनाई करण्यात आली आहे.

Adv