कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पिंपोडे बुद्रुक ग्रामीण आरोग्य केंद्रात जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी तब्बल 40 रुग्णांची तपासणी करण्यात आली
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिंपोडे बुद्रुक ग्रामीण आरोग्य केंद्रात प्राथमिक व्यवस्था अलर्ट ठेवण्यात आली आहे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेमलता कदम, डॉ शिवराज कणसे यांच्या उपस्थितीत आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक अंगणवाडी सेविकांचे कोरोना जनजागृती शिबिर आयोजित करण्यात आले होते कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून घ्यायच्या दक्षता कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्यावर दिसणारी लक्षणे याविषयी शिबिरात मार्गदर्शन करण्यात आले कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्याची व्यवस्था सज्ज ठेवण्यात आली आहे
दरम्यान कोरोना आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी ग्रामीण रूग्णालयाच्या देखरेखीखाली आरोग्य कर्मचारी व व आशा स्वयंसेविका ग्रामीण भागात घरोघरी जाऊन जनजागृती करत आहेत