जिल्ह्यातील विकासकामांचा थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

202
Adv

सातारा जिल्हयातील तसेच महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या प्रश्नांविषयी, राज्याचे मुख्य मंत्री ना.देवेंद्र फडणवीस, यांची नुकतीच मुंबई येथे भेट घेवून सदरचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत आम्ही आग्रही भुमिका घेतली असता, मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक दृष्टीकोनामधुन जागेवरच लेखी सूचना संबंधीतांना दिल्या आहेत. प्रामुख्याने वेल्हे तालुक्यातचे नाव राजगड करणे, शिवस्वराज्य सर्कीट उभारणे,सातारा येथील जनावरांच्या दवाखान्याची जागा हस्तांतर करणे, क-हाड येथील अति.जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हा कारागृह व इएसआयसी रुग्णालयकरीता जागा उपलब्ध करणे इ.कामांचा प्रामुख्याने समावेश आहे अशी माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्य मंत्री यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार सर्वांना विश्वासात घेवून, लोककल्याणाचे निर्णय घेत असल्याचे दिसत आहे. लोकहिताला प्राधान्य देत, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आदर्शावर चालणारे हे महायुतीचे सरकार आपली गतीमान कार्यक्षमता जनतेसमोर ठेवते हे सुध्दा हे स्वागतार्ह आहे असे नमुद करत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुढे म्हटले आहे की,

सातारा जिल्हयातील तसेच राज्यातील विविध संघटना, व्यक्ती संस्था, सामान्य जनता आमच्या कडे विविध प्रश्न घेवून भेटत असते. तसेच आम्ही सुध्दा काही प्रस्ताव मांडत असतो. याराज्यस्तरीय प्रश्न आणि प्रस्तावासंदर्भात आम्ही नुकतीच राज्याचे मुख्यमंत्री ना.फडणवीस यांची मुंबई येथे समक्ष भेट घेतली आणि खालील विषय मार्गी लावण्याबाबत शिफारस केलेली आहे. त्यामध्ये शिवस्वराज्य सर्किट विकसित करणे, वेल्हे तालुक्याचे नाव राजगड तालुका करणे, क-हाड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर या न्यायालयांच्या नवीन इमारतीकरीता जागा उपलब्ध करुन देणे, मिरज लोकमार्ग पोलिस ठाणे अंतर्गंत असणारे सातारा लोहमार्ग दूरक्षेत्राचे लोहमार्ग पोलिस ठाण्यात रुपांतर करणे, राज्य परिवहन महामंडळाचे सातारा विभागास नवीन बसेस उपलब्ध होणेबाबत, कास पााणीपुरवठा योजनेवर आधारित 1 कि.वॅ.क्षमतेचा लहान जलविदयुत प्रकल्प उभारणेस मान्यता मिळणेबाबत, क्षेत्रमाहुली येथे नवीन कारागृह उभारणेस्तव जागा हस्तांतरीत करणे, जिहे-कटापूर येाजनेस निधी मिळणेबाबत., सातारा शहरातील गुरांचा दवाखाना असलेली जागा, नगरपरिषदेकडे हस्तांतरीत करणे, ईएसआयसी रुग्णालय व कामगार भवन निर्माण करण्यासाठी सातारा एमआयडीसी मधील भुखंड हस्तांतरीत करणेबाबत होलार समाज आर्थिक विकास महामंडळास निधी उपलब्ध करुन देणे, आदी सार्वजनिक कामांचा समावेश आहे.
या सर्व शिफारशींचे आस्थवायिकपणे अवलोकन करुन, ना.देवेंद्र फडणवीस यांनी संबंधीत विभागांना लेखी शे-यांसह प्रश्न मार्गी लावणेबाबत आदेशित केले आहे. या कामी आमचा सातत्याने पाठपुरवा सुरु राहणार आहे. लवकरच ही सर्व कामे मार्गी लागतील असे देखिल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नमुद केले आहे.
                                              

Adv