Saturday, July 11, 2026
spot_img
Home Satara District जिल्ह्यातील कारभाऱ्यांचा जिल्हा परिषदेमध्ये भरतो काळूबाळूचा फड

जिल्ह्यातील कारभाऱ्यांचा जिल्हा परिषदेमध्ये भरतो काळूबाळूचा फड

265
Adv

जिल्ह्यातील नेत्यांना अंधारात ठेवून जिल्हा परिषदमध्ये स्वतःचे कॉन्ट्रॅक्टर नेमण्यासाठी जिल्ह्यातील कारभाऱ्यांचा एक प्रकारे काळूबाळूचा तमाशाच भरवत असल्याचे चित्र जिल्हा परिषदेच्या उत्तर विभागात दिसून येते

यादी नेत्यांची कॉन्ट्रॅक्टर कारभाऱ्यांचे अशा सवयीमुळे जिल्हा परिषदेतील उत्तर विभागात जिल्हा परिषदेतील जिल्ह्यातील नेत्यांचे कारभारी एक प्रकारे काळूबाळूचा तमाशा भरवत असून याचा आनंद जिल्हा परिषदेतील अधिकारी वर्ग कर्मचारी सर्वसामान्य नागरिक मनमुरांतपणे घेताना दिसून येतात जिल्हा परिषद मध्ये काही जिल्ह्यातील काही नेत्यांचे ठराविक कारभारी आल्यानंतर अधिकारी खाजगीत म्हणतात काळूबाळूचा तमाशा आला त्यामुळे जत्रेच्या सराई आधीच जिल्हा परिषद मध्ये काळूबाळू चा तमाशा हा वर्षानुवर्षे भरलेला दिसून येतो

जिल्ह्यातील कारभारी जर स्वतःच्या स्वार्थासाठी काळूबाळूचा तमाशा भरवून आपल्या नेत्यांची उंची कमी करत असतील तर अधिकारी वर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा सन्मान काय ठेवणार हा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे आपला तमाशाचा फड या काळूबाळूंनी जिल्हा परिषदेतुन गुंडाळावा अशी चर्चा जिल्हा परिषद मध्ये खाजगीत रंगते

Adv