जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली संपन्न  

65
Adv

1 डिसेंबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून पाळला जातो या दिनानिमित्‍ आज जिल्हा रुग्णालयात एड्स विषयी जनजागृती व्हावी यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, या रॅलिला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेंद्र सावंत व  जिल्हाधिकारी  श्वेता सिंघल यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्त केले.
यावेळी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवणि कुंभोजकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
  एचआयव्ही एड्स हा जगातील सर्वात जास्त आजाराने मृत्यु होणाऱ्या अजारांपैकी एक आजार आहे.  प्रत्येक नागरिकाने  एचआयव्ही तपासणी करुन घ्यावी. शासनाने जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व उपकेंद्रांमध्ये मोफत एचआयव्ही तपासणी उपलब्ध करुन दिलेली आहे. एचआयव्ही संसर्गित रुग्णांवर  जिल्ह्यामध्ये 3 प्रमुख एआरटी उपचार केंद्रांमध्ये तर 11 लिंक एआरटी केंद्रांमध्ये एचआयव्ही संसर्गितांवर एआरटी उपचार केले जातात. एआरटी उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्याचे प्रास्ताविकात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी सांगितले.

या कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी सुधीर बक्षी यांनी उपस्थितांना जागतिक एड्स दिनानिमित्त शपथ दिली.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे हेमंत भोसले यांनी केले. यावेळी आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासहनर्सींग कॉलेजचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थींनी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Adv