ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची प्रतिक्षा

63
Adv

सातारा शहरात पोवई नाक्यावरील आठ रस्त्याची वाहतूक अलगदपणे आपल्या पोटात सामावणाऱ्या 1280 मीटर लांबीच्या ग्रेड सेपरेटरचे काम 95 टक्के पूर्ण झाल आहे . केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्या तारखेवर ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरविला जाणार आहे . त्याआधी सर्व कामे उरकून ग्रेड सेपरेटर सज्ज ठेवण्याच्या सूचना ठेकेदार कंपनी टी अँड टी ला देण्यात आल्या आहेत .

केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची आज तारीख मिळण्याची शक्यता दाट असल्याचे कळते.

सातारा शहरात पोवई नाक्यावर सुरू झालेल्या ग्रेड सेपरेटरचे काम गेल्या अडीच वर्षापासून सुरू आहे . साधारण 75 कोटीच्या आसपास बजेट पोहचलेल्या ग्रेड सेपरेटरचे पोवई नाक्यावरील 580 मीटरचा स्लॅब टाकण्याचे काम आव्हानात्मक होते मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व टी अँड टी या ठेकेदार कंपनी यांनी हे काम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे . शाहू चौक ते एसटी स्टँन्ड मार्ग, शाहू चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय व शाहू चौक ते पारसनीस कॉलनी च्या कोपऱ्यापर्यंत वाढलेल्या सर्व मार्गिकांचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकल्प अभियंता शंकर दराडे यांनी दिली . कराड मार्गाकडे उघडणाऱ्या 165 मीटर जादा लेनचे काम सुध्दा पूर्ण झाले असून आतील सर्व रस्त्यांची डांबरीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत .केवळ अंडरग्राउंड मार्गिका मध्ये विद्युतीकरणाचे काम काही प्रमाणात बाकी असून ही कामे साधारण १५ डिसेंबर पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दराडे यांनी दिली .

केंद्रीय बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी झटपट तांत्रिक मंजुरी देत निधी उपलब्ध करून देण्यासाठी मोठे सहकार्य केले होते . या ग्रेड सेपरेरटरच्या उद्घाटनासाठी नितीन गडकरी यांची उपस्थिती असावी असा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा आग्रह असून गडकरी यांच्या मिळणाऱ्या तारखेवर ग्रेड सेपरेटरच्या उदघाटनाचा पुढील घाट जुळविला जाणार असल्याची माहिती आहे . सातारकरांना एक शानदार कार्यक्रमातून ग्रेड सेपरेटरचे गिफ्ट देण्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांची इच्छा आहे . त्यासाठी आता राजकीय धावपळ गतिमान झाली असून *आग्रहाचा राजेशाही निरोप लवकरच नागपूरपर्यंत पोहचविला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे* . नव्या वर्षाच्या मुहुर्तावर ग्रेड सेपरेटर सातारकरांच्या सेवेत रुजू झालेला असेल अशी व्यवस्था करण्यासाठी खासदारांची तयारी सुरू झाली आहे .

…असा कराल भुयारी रस्त्यांत प्रवेश
राजपथावरून लॉ कॉलेजपासून वाहने खाली उतरण्यास सुरवात होईल. या रस्त्यावर रयत शिक्षण संस्थेच्या कार्यालयापासून स्लॅब असणार आहे. कोरेगाव रस्त् .यावर पंचायत समितीच्या प्रवेशद्वारापासून वाहने खाली उतरण्यास सुरवात होईल. डाक कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरून 60 मीटरचा स्लॅब सुरू होईल. कऱ्हाड रस्त्यावर पेंढारकर हॉस्पिटलसमोरील चौकातून खाली वाहने उतरतील, त्यावर गुलबहार हॉटेलसमोरील बाजूपासून 235 मीटरचा स्लॅब पडणार आहे. बस स्थानक मार्गावर तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळून वाहने खाली उतरणार असून, जिल्हा बॅंकेच्या एमटीएमपासून भुयारी मार्गावर स्लॅब असणार आहे.

कोण जाणार भुयारातून?
– राजपथ, कास रस्ता : फक्‍त बस स्थानकाकडे जाणार
– कोरेगाव रस्ता : फक्‍त बस स्थानकाकडून बाहेर पडणार
– कऱ्हाड रस्ता : बस स्थानकाकडून येणार आणि जाणार
– इतर रस्ते : सर्व वाहने वरून (ओपन टू स्काय स्लॅब) जातील
– सेवा रस्ते : तिन्ही मार्गांवर दोन्ही बाजूला पाच मीटर

Adv