शेखर भाऊ गोरे चे पुनर्वसन करणार दुष्काळ पाहणी दरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

80
Adv

महाराष्ट्र भर दौरा करत असून मुख्यमंत्री पदाचे स्वप्न साकार करण्यासाठी मी आलेलो नाही शेतकऱ्यांना दिलासा द्यावा म्हणून मी हा दौरा करतोय असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माण खटाव येथील पाहणी दरम्यान केले युवा नेते शेखर भाऊ गोरे यांचे मी नक्की पुनर्वसन करणार असल्याचे वचनही त्यांनी यावेळी दिले

शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका सत्तास्थापन सरकार हे होईलच परंतु शिवसेना तुमच्या सोबतच आहे जे जे शक्य असेल ते आम्ही तुमच्यासाठी करणारच शेतकरी पिक विमा मिळालेले पाहिजे वेळप्रसंगी मी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरही उतरेन सत्तेसाठी मी कुठे लाचारी पत्करणार नाही हे तुम्हाला चांगलेच माहित आहे मला शेतकरी महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहावा असा दिलासाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यां शी बोलताना दिला यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील युवा नेते शेखर भाऊ गोरे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव नगरसेवक संग्राम शेटे आदी मान्यवर उपस्थित होते

Adv