जाधववाडी येथे दिवसा घरफोडी

66
Adv

जाधववाडी तालुका कोरेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसा घरफोडी केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक 14/ 3 /2020 रोजी जाधववाडी येथील दत्तात्रय किसन यादव शेती व्यवसाय करीत असून ज्वारी काढायचा हंगाम असल्यामुळे घरातील सर्व जण शेतात गेले होते याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेतला व चोरी करायच्या उद्देशाने ते घरात शिरले. परंतु शेजारील एक महिला घमेले (पाटी) मागण्यासाठी गेली आणि तिने बाहेरून आवाज दिला तर आत मधील असलेल्या चोरट्यांनी त्यांना सांगितले घरातील लोक बाहेर गेलेत. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी तेथून काही न नेताच पलायन केले.

दुपारी यादव यांच्या पत्नी घरी आल्यानंतर त्यांना घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यावेळी त्यांना आपल्या घराची चोरी झाली असल्याचे लक्षात आले. शेजारील महिलेमुळे यादव यांची होणारी चोरी दैव बलवत्तर म्हणून वाचली. परंतु दिवसा होणाऱ्या घरफोड्या मुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शनिवारी रात्रीच्या 3.30 च्या वेळेस वाठार स्टेशन येथील रेल्वे गेट मधील पानटपरीचे कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरटा आत शिरला होता

परंतु त्यावेळीही नाईट राउंड ला असलेले पोलीस त्या बाजूकडून जात होते त्या वेळी पोलिसांना शंका आली हे अज्ञात चोरट्याचा लक्षात येताच त्याने पानपट्टीतून उडी टाकून अंधाराच्या दिशेने पलायन केले पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला परंतु चोरटा पळण्यात यशस्वी झाला. या ठिकाणीही वाठार पोलिसांच्या सतर्कते मुळे चोरी होता होता वाचली.

Adv