छोट्या-मोठ्या माशांनी अनेक पालिकेतील लाचखोरी खाल्ली असून याची खरी दोरी ही देवमाशा पर्यंत पोहोचते देव माशाच्या आशीर्वादाने सर्वकाही पालिकेत चालत होते म पालिकेतील देवमासा पाण्याच्या बाहेर कसा व छोटे मासे हे गळाला लागले असून देव मासाच बाहेर कसा असा प्रश्न सातारकरांना पडला आहे
पाण्यात देवमासा असला तर त्याच्याशिवाय काही होत नाही हे त्रिवार सत्य असून कुठे ना कुठे तरी छोट्या-मोठ्या माशांचे खाद्य हे देव माशान पर्यंत पोहोचत होते हे मात्र नक्की असले तरी येणाऱ्या काळात देव मासा सापडतो की नाही हे बघणे उत्सुकतेचे असेल देवमासा हा आता दुसर्या तलावात जाण्याच्या मार्गावर असून लवकरात लवकर कशी नदीपार करता येईल आपण दुसर्या तलावात छोटे मोठे मासे हेरून भरपूर खाद्य जमवुन पोट पूजा करण्याचा त्याचा मानस दिसतोय त्याच्या अगोदरच हा देव मासा गळाला लागला तर आश्चर्य नको
खरा गळ हा देव माशावर पडायला पाहिजे होता यातून तो सहीसलामत पळण्याच्या मार्गावर असून त्याच्यावरही आता बारीक लक्ष ठेवले पाहिजे सर्वांना शंका येते की देव माशानेच सर्वांना खायला घालून गळाला लावले अशी पाल मनात चुकचुकत आहे देव माशाच्या पालिकेत अनेक ठिकाणी डुबक्या आहेत एका डुबकीतच छोटे मासे गळाला लागले असून देव मासा कधी गळाला लागतोय याकडे आता सर्व सातारकरांच्या नजरा लागलेल्या आहेत