संपूर्ण देशात सहकार क्षेत्रातील नावाजलेली अग्रगण्य असणारी “आपली बँक” जिल्हयातील सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर कष्टकरी, व्यापारी, उद्योजक, व्यवसाईक, नवउद्योजक, विद्यार्थी,पगारदार कर्मचारी, सर्व प्रकारच्या सहकारी संस्था, छोटे व्यवसायिक, बचतगट, शेतकरी मंडळे अशा सर्वच जिल्हावासियांना थेट व प्राथमिक विकास सेवा सोसायटी मार्फत किफायतशीर व्याज दराने विविध कर्ज योजनांचा लाभ देवून, जिल्हयाच्या आर्थिक विकास व उन्नतीकरिता सामाजिक जीवनमान उंचावणेकामी व राहणीमानाचा दर्जा उत्तमोत्तम व्हावा याकरिता अर्थपुरवठा करुन त्यात सातत्याने कार्यरत आहे सातारा जिल्हा बँक आजवर ७ लाखाचे वर कर्जदार सभासद कुटूंबाबरोबर आहेच, शिवाय सर्व
सामान्याची शेतक-याची बँक आपुलकीचा जिव्हाळा जपत तत्पर व विनम्र सेवा देणारी आपली बँक आता “माझी बँक” म्हणून जिल्हयाची अर्थवाहिनी अशी ओळख व नावलौकिक प्राप्त देशातील सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक बँक म्हणून नावाजलेली व प्रत्येक जिल्हावासियांना अभिमान वाटावा असा “सहकाराच्या नभागणांतील ध्रुवतारा म्हणूनच शेकडो पुरस्कार प्राप्त आपली बँक आता थेट आपल्या दारी…”
गत दोन वर्षापासून जगातील कोरोना महामारीमुळे अवघे समाजजीवन ठप्प झाले. यात सर्वच घटक बाधित झाले, हजारो लाखो कुटूंबाना आपली जिवा-भावाची माणस गमवावी लागली.अर्थार्जनाची सर्व साधनांबरोबरच दळण वळण देखील ठप्प झाले. अवघा समाज कोलमडून गेला.वाढती महागाई व नवनवीन येणारे नैसर्गिक विविध संकटे यातून समाज सावरावा, त्यांचे जीवनमान सुकर व्हावे या सामाजिक बांधिलकीच्या उदात्त हेतूने बँकेचे पुरोगामी विचारांचे व नाविन्यांचा ध्यास असलेले बँकेचे मा संचालक मंडळाने व्याजदर कपातीचा धोरणात्मक निर्णय घेवून संपूर्ण जिल्हयाचे सर्वसामान्य घटकांचे अर्थकारण सुधारावे, जीवनमान सुकर होवून प्रत्येक घटकास त्याचा लाभ होणेचे दृष्टीकोनातून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचा सर्व जिल्हावासियांनी लाभ घ्यावा. बँकेच्या ३१९ शाखामार्फत जिल्हयातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचून आर्थिक विकासाचे चक्र
अधिक गतिमान करुन समाजातील सर्वच घटकांना सामावून घेवून, उदयाचा देशातील सर्वात प्रगतशील जिल्हा घडविणेचा मानस नजरेसमोर ठेवून घेतलेल्या व्याज कपातीचा फायदा शेतकरी, व्यापारी,व्यवसाईक, नोकरदार व प्रत्येक जिल्हा वासियांनी घ्यावा. १ ते ३% पर्यंत व्याजदरात योजनानिहाय
कपात दि. ०१/०५/२०२२ महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून केले गेले आहे. असल्याची माहिती चेअरमन नितीन पाटील यांनी यावेळी दिली