राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर या प्रथमच प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यालय येथे येत असून त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महिलांची मीटिंग आयोजित केली असल्याची माहिती महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव यांनी दिली
प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर या पुणे शहराच्या अध्यक्ष होत्या चित्रा वाघ यांनी पक्षांतर केल्यानंतर रूपाली चाकणकर यांच्यावर पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली ती जबाबदारी त्यांनी योग्यरीत्या विधानसभा निवडणुकीत पार पडल्याने त्या राष्ट्रवादीच्या मुलुख मैदानी तोफ म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्या आहेत उद्याचा त्यांचा सातारा दौरा नक्कीच महिलांना ऊर्जा देऊन जाईल असं चित्र राष्ट्रवादी कार्यातील महिलांमध्ये दिसत आहे