राजवाडा ते गुरांचा दवाखाना येथील रस्त्याचे काम करताना संबंधित ठेकेदाराने रस्ता आपलाच आहे अशा अविर्भावात राहून दोन्ही बाजूकडून रस्ता पूर्ण बंद केला होता याचे वृत्त सातारानामा ने प्रसिद्ध करताच काही मिनिटातच सातारा शहर पोलीस ट्रॅफिकचे पोलीस निरीक्षक श्री शेलार साहेब यांनी तो रस्ता खुला करा असा आदेश देत रस्ता खुला केला। संबंधित रस्ता खुला झाल्याने नागरिकांनी फोन वरून सातारानामाचे अभिनंदन केले