सातारा येथील श्री समर्थ सदन मध्ये समर्थ सेवा मंडळाच्या वतीने सध्या दासनवमी उत्सवांतर्गत सामुदायिक दासबोध पारायण सुरु आहे.या पारायणासाठी मंडळाचे कायर्ंाध्यक्ष अॅड. डी. व्ही. देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली समर्थ भक्त बाळुबुवा कुलकर्णी रामदासी यांचे कडून प्रमुख वाचन होत आहे.सकाळी आठ ते साडेअकरा या वेळेत समर्थाच्या ग्रंथराज दासबोधाचे सामुदायिक वाचनाचा कार्यक्रम येत्या 17 फेब्रुवारी पयर्ंंत सुरु रहाणार आहे. वाचना दरम्यान बाळुबुवा रामदासी यांचेकडून या श्लोकांचे विवेचनही उपस्थितांना मिळत आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात मन:शांती साठी दररोज समर्थाचे वाड:मयाचे वाचन करणे अतिशय उपयोगी आहे.या विचारातून प्रत्येकाने आपले जीवन समृध्द, आनंदी, विनात्रासाचे,तणाव विरहीत आणि संपन्न करण्यासाठी दासबोध वाचनातून मिळणारे मार्गंदर्शन हे मोलाचे आहे.असे यावेळी सांगण्यात आले.या दासबोध पारायणासाठी सातारा शहर परिसरातील 80 हुन अधिक स्त्री व पुरुष सहभागी झाले आहेत.वयोवृध्दांसाठी वाचनाचे वेळी खास आसन व्यवस्थाही करण्यात आली आहे.
या दासबोध पारायणाचे यशस्वितेसाठी मंडळाचे मधुकर बाजी,मुकुंद लांडगे,राजु कुलकर्णी,रवीबुवा आचार्य, सौ.कल्पना ताडे आदी विशेष परीश्रम घेत आहेत. येत्या दि. 17 फेब्रवारीला दासनवमीला सकाळी या पारायणाची सांगता होवून प्रसाद वितरण होणार आहे.