साताऱ्यातील कोविड योद्ध्यांचा खासदार उदयनराजेंनी केला सत्कार

41
Adv

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी राष्ट्राला नव्हे तर जगाला सर्वधर्म भाव आणि माणुसकी यांचे विचार दिले आहेत ते आत्मसात करून त्या विचारांवर आपण सर्वांनी वाटचाल केली तर covid-19 चे नवे तर आणखी मोठ्या संकटांचा सामना करण्याचे धारिष्ट्य आणि बळ आपल्याला मिळेल असे आत्मशक्ती वाढणारा संदेश खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी देताना जगामध्ये भारतीय संस्कृती अत्यंत महान असून आज आपल्या संस्कृतीचा आणि आयुर्वेदाचा संपूर्ण जग उपयोग करण्याचा प्रयत्न करीत आहे अशा महान संस्कृतीचा वारसा आपल्याला लाभला आहे याचा आपण सर्वांना अभिमान वाटला पाहिजे असे गौरव उद्गार कोरोना योद्धा गौरव करताना श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त

कोणताही उपचार नसलेल्या या कोरणा संसर्गजन्य रोगाने सर्वत्र हाहाकार माजला असताना गरजू व्यक्तींना लागेल ती मदत पाण्यासारख्या covid- योद्धामुळे समाजाला मिळालेली आहे आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याची गरज भागवण्याची आणि त्यागाची परंपरा आपल्याला लाभली असल्याने साताऱ्यात नव्हे तर देशात ठिकठिकाणी विशेष करून युवावर्ग या कठीण प्रसंगी समाजाच्या गरजेला जीव धोक्यात घालून उभा राहिला आहे त्यामुळेच आज ज्यांनी ज्यांनी अन्नधान्य किराणा साहित्य जीवनावश्यक वस्तू औषधे आधी बरोबरच रक्तदान यासारखे उपक्रम राबवले त्यामुळे रक्ताचा तुटवडा बसला नाही हे समाजाचे फार मोठे भाग्य आहे त्यामुळेच प्रातिनिधिक स्वरूपात आयोजित करण्यात आलेला हा सत्कार सोहळा निश्चितच वेगळा आणि आपलेपणाचा आहे या सत्कार सोहळ्याला बद्दल सर्व सत्कार मूर्तीचे आम्ही व्यक्तीच्या अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो

कार्यक्रमास विविध संस्थांचे प्रतिनिधी मंडळाचे पदाधिकारी नगरपरिषदेचे प्रतिनिधी तसेच उपनगराध्यक्ष किशोर शिंदे अशोक घोरपडे जितेंद्र खानविलकर नगरसेवक सागर साळुंखे काका धुमाळ शैलेश चव्हाण संग्राम बर्गे गणेश जाधव गोलू साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते

Adv