संपूर्ण जगामध्ये जलद गतीने फैलावणा-या कोरोना या विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आणि प्रबोधन करण्याच्या हेतुने, सातारा नगरपरिषदेच्या क्षेत्रात प्रतिबंधात्मक सर्व उपायोजना करण्यात आल्या असून, नगरपरिषदेच्या माध्यमातुन सातारा शहरात सर्व ठिकाणी स्वच्छता, औषध फवारणी आणि कोरोना विषयक जनजागृती करण्यासह, प्रतिबंध करण्याकरीता प्रभागनिहाय शीघ्र प्रतिसाद पथके नेमण्यात आली आहेत. याकामी सामुहिकरित्या कोरोना विषाणुवर मात करण्यासाठी सांघिक उपाययोजना आखण्यात आली आहे अशी माहीती सातारा नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी दिली.
याविषयी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे की, सातारा जिल्हयाचे दिशादर्शक आदरणीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कोरोना विषाणुच्या संकटावर कोणतीही कसर न ठेवता, शास्त्रीय पध्दतीने सर्व त्या उपाययोजना कराव्यात अश्या सूचना दिल्या असून, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्व्थापन समिती,सातारा यांचेकडून मिळणा-या सूचनांप्रमाणे, नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती सौ.अनिता घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपरिषदेने तीच्या हद्दीमध्ये कोरोनाचा प्रार्दुर्भाव होवू नये म्हणून समाजप्रबोधनाच्या उपाययोजना राबविल्या आहेत, त्यामध्ये सातारा शहरात येणा-या सर्व मार्गावर मोठी होर्डिंग्ज उभारलेली आहेत. तसेच सातारा शहरात विविध ठिकाणी बॅनर्स, तसेच सातारा शहरातील सर्व घंटागाडयांच्या स्पिकरवरुन, करोना विषयक माहीती क्लिपचे प्रसारण केले जात आहेत. तसेच सातारा शहरात प्रत्येक प्रभागात हार्बो स्प्रे, जंतुनाशक पावडर इत्यादीची फवारणी व फॉगिंग करण्यात येत आहे.
नगरपरिषदेमध्ये 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून, त्याठिकाणी दोन् कर्मचा-यांची तीन शिफटमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सातारा शहरात प्रत्येक कुटुंबाचे सर्वेक्षण करुन वस्तुस्थितीजन्य अहवाल तयार करण्याचा सुक्ष्म आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रभागात एक नियंत्रण अधिकारी आणि त्याच्या अधिपत्याखाली एकूण 9 ते 10 व्यक्तींचे एक पथक अशी 22 पथके तयार करण्यात आली असून, त्यांचे नियंत्रण करण्या करीता शहर शीघ्र प्रतिसाद पथक नेमण्यात आले आहे. त्यांच्या मार्फत शहरातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्य विषयक तसेच कुटुंबातील व्यक्तींचे परदेशगमन इत्यादी बाबतची माहीती गोळा करुन, जरुर तेथे प्रतिबंधांत्मक उपाययोजना गरज पडेल तशी वापरण्यात येणार आहे.
सातारा शहरातील एकमेव मॉल तसेच सिनेमागृहे दि.31/03/2020 पर्यंत बंद करण्यात आली आहेत. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होवू नये म्हणून सातारा शहरातील बाग-बगिचे आणि राजवाडा येथील खाद्यपदार्थ्यांच्या गाडया 17/03/2020 पासून 31/03/2020 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तश्या सूचना संबंधीतांना दिल्या असून, प्रतिबंधांत्मक उपाययोजना, कोरोना या विषाणुचा फैलाव होवू नये म्हणून करण्यात आल्या आहेत. त्यास नागरीकांनीही सहकार्यात्मक योगदान दयावे असेही नगराध्यक्षा सौ.माधवी कदम आणि उपनगराध्यक्ष किशोर शिंदे ,
आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी प्रसिध्दीपत्रकात शेवटी नमुद केले आहे.
Home Satara District Satara City प्रत्येक प्रभागात हार्बो स्प्रे, जंतुनाशक पावडर इत्यादीची फवारणी व फॉगिंग करण्यात येणार...