देशात बऱ्याच अवधीनंतर नव्याने आढळणाऱ्या कोविड रुग्णांची एका दिवसातील संख्या एक हजाराच्यावर गेली आहे. गेले अनेक दिवस ही संख्या खूपच रोडावली होती. पण पुन्हा ही संख्या 24 तासांच्या अवधीत एक हजाराच्यावर गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात गेल्या 24 तासांत 1,134 नवीन कोरोना व्हायरस प्रकरणे नोंदली गेली आहेत. त्यामुळे देशातील एकूण सक्रिय कोविड रुग्णांची संख्या 7,026 इतकी झाली आहे.
याच काळात छत्तीसगड, दिल्ली, गुजरात केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्ण दगावला. त्यामुळे कोविडमुळे दगावलेल्या देशातील एकूण मृतांची संख्या आता 5,30,813 वर पोहोचली आहे. कोविड तपासण्यासाठी आतापर्यंत एकूण 92.05 कोटी चाचण्या घेण्यात आल्या असून गेल्या 24 तासांत 1,03,831 चाचण्या करण्यात आल्या आहेत.