गेल्या सहा महिन्यांपासून सातारा शहरातील चालू असलेली मल्हार पेठ ते ५०१ पाटी या रस्त्यावरील एकेरी वाहतूक दुहेरी करण्यात या मागणीसाठी सातारा जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा मा. सौ धनश्रीताई महाडिक यांनी पोलीस उपअधिक्षक (गृह) मा. साळुंखे यांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा महिला उपाध्यक्षा मा. सौ. सुषमा घोरपडे, अंजुम खान, विद्या सावंत, स्मिता यादव, सुजाता चव्हाण, पुष्पा जैन, सोफिया इनामदार, नाजिया खान, स्नेहल कळसकर, मालन परळकर, विशाल पवार, गणेश शिंदे आणि व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते.*
अगोदरचं बाजारामध्ये मंदी असताना आणि त्यातचं या एकेरी वाहतूकीच्या नियमामुळे या रस्त्यावरील व्यापारी वर्गाला फार मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. दुकानाचा खर्च, कामगारांचा पगार यामुळे दुकानदार आज मेटाकुटीला आले आहेत. तसेचं यामुळे महिलांना, शाळेतील विद्यार्थ्यांनाही यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा रस्ता एकेरी करण्यामागचे कारण नक्की काय आहे आणि ते योग्य आहे का याचा विचार प्रशासनाने करावा.*
*मोती चौक ते ५०१ पाटी या दरम्यान ६५३ दुकाने आहेत. प्रत्येक दुकानात सरासरी ३ व्यक्ती काम करतात. या सर्व लोकांचा उदरनिर्वाह यामुळे धोक्यात आलेला आहे. यातील मोजकेच व्यापारी स्वतःच्या जागेत व्यवसाय करतात नाहीतर बहुतांश व्यापाऱ्यांनी व्यावसायिक करार करून दुकान भाडेतत्वावर घेतले आहे. त्यामुळे हा व्यापार आता आतबट्ट्याचा धंदा झालेला आहे. तरी प्रशासनाने योग्य ती कारवाई करून ही समस्या लवकरात लवकर सोडवावी नाहीतर याविरूद्ध तीव्र आंदोलन छेडले जाईल याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी.*