Friday, June 5, 2026
spot_img
Home Satara District मेडिकल कॉलेजला छत्रपती वीर संभाजीराजे महाराज यांचे नाव देण्याची शिवप्रेमींची मागणी

मेडिकल कॉलेजला छत्रपती वीर संभाजीराजे महाराज यांचे नाव देण्याची शिवप्रेमींची मागणी

280
Adv

सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक वर्तुळात महत्वाचा ठप्पा ठरणारे सातारा मेडिकल कॉलेजची उभारणी वेगाने सुरू आहे . सातारा ही ऐतिहासिक नगरी असून मराठा साम्राज्याची राजधानी आहे त्यामुळे मेडिकल कॉलेजला छत्रपती वीर संभाजीराजे महाराज यांचे नाव देण्याची मागणी शिवप्रेमींकडून होऊ लागली आहे .

साताऱ्यातील अनेक सामाजिक संघटना आणि शिवप्रेमी समर्थकांनी खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे सातारा नगरीच्या इतिहासाला तब्बल तीनशे वर्षांचा इतिहास असून, मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून शाहूनगरीला विशेष मानं आहे . छत्रपती शिवराय आणि त्यांच्या वंशजांच्या पराक्रमाचा आणि कर्तृत्वाचा इतिहास जपणे आणि तो वारसा जतन करणे हे सातारकरांचे कर्तव्य आहे छत्रपती वीर संभाजीराजे महाराज यांची इतिहासातील बत्तीस वर्षाची कारकिर्द ही दैदिप्यमानं आहे धर्मरक्षणासाठी प्राणोत्क्रमण करणाऱ्या छत्रपती वीर संभाजीराजे यांच्या नावाचे एकही स्मारक अथवा शिल्प साताऱ्यात नाही . त्यामुळे सातारा मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्यात यावे हा समस्त सातारकरांचा एकमुखी सूर आहे .

साताऱ्याचे मेडिकल कॉलेज ही जिल्ह्याची अस्मिता आहे व छत्रपती वीर संभाजीराजे महाराज यांच्या नामःकरणाने या अस्मितेला नवी झळाळी मिळणार आहे

Adv