काही तासांपूर्वी राजवाडा ते गुरांचा दवाखाना येथे पॅचिंग केले होते त्यावर काही तासातच चौपाटीच्या घाण व खरकाटे पाणी फिरल्याने त्या पॅचिंगचा काय उपयोग असे रात्री येणारे जाणारे नागरिक बोलत होते
एकतर सातारातील रस्त्याने नागरिकांचे कंबरडे मोडले होते त्यातच पालिकेने पॅचिंग केले ते किती दिवस टिकणार हे वृत्त सातारानामा ने प्रसिद्ध केले होते काही तास होत नाही तोपर्यंतच चौपाटीचे रात्री दहा नंतर चे पाणी रस्त्यावर फेकले जाते त्यामुळे पावसाळ्यात तर सोडाच काही दिवसातच निकृष्ट ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे
चौपाटीच्या पाण्यामुळे रस्ता व पॅचिंग खराब होत असेल तर त्यांच्यावर अंकुश कोणाचा नाही का कोणाच्या आशीर्वादाने सर्व चालतय सर्वसामान्य नागरिकांनी काय केले असते त्याच्यावर कारवाई केली असती मात्र चौपाटीवर पालिका कारवाई करताना दिसत नाही असंच चालत राहिले तर नुसता पालिकेच्या तिजोरीवर भारच पडल्याचे दिसले