उदयनराजेंचा पराभव आमच्यासाठी अनपेक्षित चंद्रकांत दादा

62
Adv

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप जास्त जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. तर दुसरीकडे सेनेनं आक्रमक होत मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु, देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. बदलाचा प्रश्नच नाही. त्यांचं काम चांगलं आहे, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

आपल्याला काय हवं आहे ते व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो. मात्र, सत्तास्थापने संदर्भातील सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना आहेत. पुढील दोन-तीन दिवसात याबाबतची बोलणी सुरू होईल. आवश्यकता भासल्यास राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी ते बोलतील,अशी माहितीही त्यांनी दिली.
उदयनराजेंना दिलासा
उदयनराजेंचा पराभव आमच्यासाठी अनपेक्षित आहे, असं असलं तरी पक्षसंघटना त्यांची योग्य ती काळजी घेईल, असं सांगत त्यांनी उदयनराजेंना दिलासा दिला आहे.

Adv