करोणाच्या महामारीत जिल्ह्यातील गोरगरिबांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांचा मित्र समूह सर्वाधिक मदत करणारा एकमेव मित्र समूह ठरला आहे
सातारा जिल्ह्यातील डोंगरी, दुर्गम भागातील वाड्या, वस्त्यांवर राहत असलेल्या ग्रामस्थांना सध्याच्या कोरोनाच्या महामारीत जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासत आहे. या भागातील ही गैरसोय पाहून श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्यासह त्यांच्या मित्र समूहातर्फे ग्रामस्थांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप मास्क सँनी टायझर p p कीट अशा विविध स्वरूपात मदत करण्यात आली सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातील वाड्या, वस्त्यांवरील ग्रामस्थांच्या मदतीसाठी श्रीमंत छत्रपती उदयनराजे मित्र समूह सरसावल्यामुळे येथील डोंगरी भागातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सातारा व जावली तालुक्यातील ठोसेघर, कास, देऊर, चिखली, शेंद्रे, नागठाणे, भरतगाव, देवकरवाडी, ढेन, चिखली, निसराळे इतर गावांमध्ये घिसाडी समाज, कातकरी समाज, डवरी, बेलदार, धनगर, गोसावी तसेच इतर समाजातील गोरगरिबांना धान्याच्या माध्यमातून मदतीचा हात दिला. याच पद्धतीने अविरत मदतकार्य करण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आल्या.