सातारा जिल्हयात कृषी संशोधन केंद्राची मागणी खासदार उदयनराजे यांनी घेतली केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांची भेट

400
Adv


राज्यातील कृषी विषयक प्रश्नांवर केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची दिल्ली येथे भेट घेतली तसेच यावेळी कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन केंद्र विकसित करणे, कृषि यंत्र उपलब्ध करून देणे यासह अनेक मुद्द्यांवर तसेच सातारा जिल्ह्यातील कृषि विषयक अनेक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या गर्तेत अडकलेल्या शेतकऱ्यानां केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून आधार देण्याची गरज आहे. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील स्ट्रॅाबेरी, हळद, आले उत्पादक शेतकऱ्यासाठी संशोधन केंद्र उभारणीची गरज आहे. जेणेकरून या उत्पादनास चालना मिळेल. त्यासाठी केंद्रातून विशेष निधी उपलब्ध करण्याचा आपण प्रयत्न करू.

केंद्रीय कृषिमंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या भेटी दरम्यान राज्यातील शेती आणि शेती तंत्रज्ञानावर चर्चा केली. विशेषत: राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन होत असताना त्याची तोडणी करणे शेतकऱ्यांसाठी अडचणीची होत आहे. त्यासाठी ऊस तोडणी यंत्राची गरज आहे. या मशिनची किमती सामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नसल्यामुळे केंद्राने यासाठी अनुदान देवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पूर्वी ऊस तोडणी यंत्रासाठी अनुदान मिळत होते. मात्र हे अनुदान बंद केल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र शासनाने याकडे लक्ष द्यावे.

सातारा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती लक्षात घेवून कृषी मंत्रालयने विविध योजना तसेच संशोधन केंद्रे निर्माण करणे आवाश्यक आहे. विशेषत: कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यानां मार्गदर्शन होणे गरजे आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात स्ट्रॅाबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे स्ट्रॅाबेरीवर संशोधन करणारे एक केंद्र उभारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. तसेच हळद संशोधन केंद्र आणि आले संशोधन केंद्र उभारणीसाठी आपण प्रयत्न करत आहोत.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, खते-औषधे यांचाही खर्च निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारनेशेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी अशी आमची आग्रही मागणी आहे.

Adv