Saturday, April 25, 2026
spot_img
Home Satara District Satara City छ उदयनराजे यांचा अजून एक धक्का बॉम्बे रेस्टॉरंट पुलाला श्री छ प्रतापसिंह...

छ उदयनराजे यांचा अजून एक धक्का बॉम्बे रेस्टॉरंट पुलाला श्री छ प्रतापसिंह उर्फ दादा महाराज असे नामकरण

160
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे धक्कातंत्र अद्याप संपलेले नसून बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड़डाण पुलाला श्रीमंत छ्त्रपती प्रतापसिंह उर्फ दादासाहेब महाराज असा नामफलक झळकल्याने सातारकरांना आश्चर्याचा धक्का बसला . या दुसऱ्या धक्क्याची प्रशासनातही जोरदार चर्चा रंगली .

भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांचा दृश्यम स्टाईल गनिमी कावा प्रशासनालाही गोंधळात टाकणारा ठरला आहे अचानक मेडिकल कॉलेजच्या जागेची पाणी मग जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक नंतर पुन्हा ग्रेड सेपरेररची प्रशासनासह पाहणी या उदयनराजेंच्या धक्का तंत्रांनी राष्ट्रवादी सह प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना चांगलेच खिळवून ठेवले आहे

खा. उदयनराजेंनी आठ दिवसांपूर्वी ग्रेड सेपरेटर सर्वांसाठी खुला केला. सातारकरांना त्यांचा सुखद धक्का बसला. दुर्दैवाने मात्र याचे उद्घाटन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक बॅनर फाटल्याने तणाव निर्माण झाला होता. अशातच मंगळवारी रात्री पुन्हा एकदा पुणे -बंगळूर महामार्गावरील सातारा पालिकेच्या हद्दीत येणाऱ्या “बाँबे रेस्टोरंट” चौकातील कोरेगावकडून साताऱ्यात येणाऱ्या उड्डाण पुलाला रातोरात “श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादासाहेब उड्डाणपूल” असे नामकरण केलेला बॅनर लागला

Adv