युवकाने छ उदयनराजेंसाठी रक्ताने , केंद्रीय अमित शहा यांना लिहिले पत्र

140
Adv

छत्रपती उदयनराजेंच्यावर प्रेम करणारे राज्यात, देशात हजारो तरुण आहेत परंतु सातारा जिह्यातील बोंडारवाडी गावातील नीलेश सुर्यकांत जाधव या युवकाने चक्क स्वतःच्या रक्ताने स्वतःच्या वाढदिवसादिवशीच मुंबईतल्या खोलीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले आहे. सकाळी हे पत्र लिहिले अन् ते सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

सातारचे माजी खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांनी खासदारकीचा राजीनामा देवून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढवल्याचे सर्वांना ज्ञात आहे. साताऱयात राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील हे निवडून आले. उदयनराजे भोसले यांच्यावर प्रेम करणारे तरुण आज महाराष्ट्रासह देशात आहेत. असाच एक तरुण बोंडारवाडी येथील नीलेश जाधव हा. तो तेज ग्रुपमध्ये कामाला आहे. नीलेश जाधव हा तरुण मुंबईत कामानिमित्त गेला होता. त्याचा वाढदिवस आज असल्याने वाढदिवसानिमित्ताने सकाळीच तो उदयनराजेंसाठी थेट केंद्रीय मंत्री अमित शहा यांना रक्ताने पत्र लिहायला बसला. त्याने पत्र लिहिले अन् त्याने लिहिलेले पत्र दुपारी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

तो म्हणाला आमच्या घरी माझ्या आजोंबापासून छत्रपती उदयनराजे व त्यांच्या कुटुंबांवर आमचे प्रेम आहे. माझेही राजेंवर प्रेम आहे. उदयनराजेंना केंद्रात मंत्रीपद मिळावे अशी माझी इच्छा आहे ती माझ्या रक्ताने मांडली आहे, असे त्याने सांगितले.

Adv