Monday, April 20, 2026
spot_img
Home Latest News Politics खा श्री छ उदयनराजे यांनी दिले विविध मागण्यांचे रेल्वे मंत्री गोयल...

खा श्री छ उदयनराजे यांनी दिले विविध मागण्यांचे रेल्वे मंत्री गोयल यांच्याकडे निवेदन

506
Adv

सातारा जिह्यासह पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारे रेल्वेचे विविध प्रकल्प साताऱयात आणण्या बरोबरच कराड ते चिपळूण रेल्वे मार्गाचे काम मंजूर असून ते तातडीने सुरु करण्याची मागणी खा उदयनराजे भोसले यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही त्यांनी दिले तसेच रेल्वेच्या विविध प्रश्नावर मंत्री गोयल यांच्याशी सविस्तर चर्चा केली.

“>मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या भेटीनंतर खासदार उदयनराजेंनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी सातारा जिह्यातील रेल्वेच्या विविध प्रकल्पांबाबत व मागण्यांबाबत आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. गोयल यांनी साताऱयासाठी जास्तीत जास्त रेल्वेचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले

“;यावेळी विविध मागण्यांचे निवेदनही त्यांनी मंत्री गोयल यांना दिले. यामध्ये प्रशासकीय मंजुरी मिळालेला सुमारे 3 हजार कोटी रूपये खर्चाच्या कराड-चिपळूण रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करावे. पर्यटनदृष्टय़ा महत्वाचे असलेले सातारा रेल्वे स्टेशनचे नुतनीकरण आणि सुशोभिकरण तात्काळ करावे. सातारा जिह्यातील महागाव येथे रेल्वे खात्याची 50 एकर मोकळी जमीन उपलब्ध असून या जमिनीवर रेल्वेचा स्वत:चा सौरउर्जा प्रकल्प उभा करावा. जेणेकरून निर्माण झालेली वीज रेल्वेच्याच वापरात येईल. या महत्वाच्या मागण्यांसह रेल्वेचे विविध प्रकल्प जिह्यात आणण्याबाबत मंत्री गोयल यांच्याशी चर्चा केली.

Adv