जिल्ह्यातील भाजपच्या मंडलाच्या निवडी जाहीर झाल्या मात्र दस्तुरखुर्द भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या कराड उत्तर तालुक्यातीलच निवडी न जाहीर झाल्याने पदाच्या कार्यक्षमतेवरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे
मंडलाच्या निवडी जाहीर होण्याची प्रक्रिया गेल्या पंधरा दिवसापासून सुरू होती प्रत्येक मतदारसंघात लोकप्रतिनिधींना विचारून मंडलाच्या निवडीत केल्या गेल्या मात्र ज्यांनी आज मंडलाच्या निवडी जाहीर केल्या ते भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचा कराड उत्तर हा तालुका या मंडलाच्या निवडीविना राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे
कराड उत्तर मध्ये आमदार भाजपचा जिल्हाध्यक्ष भाजपचा तरीही निवडी होऊ शकले नाही मंडलाच्या निवडी करताना कोणाचे धैर्य खचले हेच कळायला मार्ग नाही कराड उत्तरेतील मंडलाच्या निवडी मुंबईत होणार असून कोणाची निवड होते याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
वाई तालुक्याच्या निवडीही त्याबरोबर राहिल्या असल्या तरी तिथे ना आमदार भाजपचा ना जिल्हाध्यक्ष भाजपचा त्यामुळे वाई तालुक्यातील निवडी होतीलच यात कोणाच्या मनात तीळ मात्र शंका नसून दस्तूर खुद्द आमदार व जिल्हाध्यक्षांच्या तालुक्यातीलच निवडी रखडल्याने जिल्हाध्यक्षपदावरच एक प्रकारे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे