सातारा शेती उत्पन्न बाजार समिती कार्यालयातीलविक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी – सुषमा_राजेघोरपडे

148
Adv

यासमोर व शेती उत्पन्न बाजार समिती आवारात अनाधिकृतपणे भाजी विक्री करणाऱ्या

सातारा शेती उत्पन्न बाजार समिती कार्यालयासमोर व शेती उत्पन्न बाजार समिती आवारात अनाधिकृतपणे भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर लवकरात लवकर कारवाई करण्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी मा. सुनिल थोरवे यांना समक्ष भेटून तक्रारवजा निवेदन दिले.

याची एक प्रत माहितीसाठी नगरपालिका, अभियंता सा.बां विभाग, बाजार समिती कार्यालय, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, शाहूपुरी पोलीस ठाणे, वाहतूक शाखा सातारा शहर यांना दिली व या विषयाचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले.

२०२० पासून आम्ही सर्व शेतकरी व व्यापारी बांधव एक उपक्रम राबवणार आहोत. दररोज बाजार समिती आवारात व बाजार समिती कार्यालयासमोर जी परिस्थिती असेल ती सोशल मिडीया (ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सऍप) द्वारे जनतेसमोर आणणार आहोत. त्यामुळे सत्य परिस्थिती जनतेसमोर येईल आणि प्रशासनालाही त्याची माहिती होईल. त्या परिस्थितीला अनुसरून नियमानुसार योग्य असेल ती कारवाई प्रशासनाने करावी अशी आग्रही मागणी आमची सर्व विभागांकडे आहे.

आगामी काळात या परिस्थितीत काहीचं फरक न पडल्यास, आम्ही बाजार समिती कार्यासमोरील रस्त्यावर रस्ता रोको करून, शेतकरी व व्यापारी बांधवांसह धडक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढू असा निर्वाणीचा इशारा आम्ही या निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाला देत आहोत.

Adv